वैजापूर - येनोली माल रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करण्याबाबत, सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन.
तळोधी (बा.):
वैजापूर - येनोली माल, सोनापुर रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करण्याबाबत, सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
चिमूर सोनापुर कोजबी रोडवरील वैजापूर येनोली माल सोनापूर हा (ग्रामीण मार्ग क्र ११५) रस्ता काही कारणास्तव अपूर्ण राहिला आहे तरी सदर रस्त्याने ये जा करताना अडचण होत आहे खड्डे पडलेले आहे त्यामुळे सदर रस्ता DPDC फंड मधून वैजापूर – येनोली माल – सोनापूर बूज सदर गावाच्या विकासाकरिता आपल्या गावाच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावे. या करीता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी येनुली माल चे लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर, सावरगाव चे सरपंच रवी निकूरे, होमदेव मेश्राम, इत्यादी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!