तालुका क्रीडा अधिकारी यांचे दुर्लक्षतेमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद
तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या दुर्लक्षेतेमुळे मूल येथील क्रीडा संकुलातील मंजूर सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू झाले नसल्याचा आरोप होत असून, हे कॅमेरेच नसल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या तीन सायकली चोरी झाल्याचा आरोप आता होत आहे.
पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निधीतून चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करण्यात आले आहे. इनडोअर हाॅल व ग्राउंड डेव्हलपमेंट करीता साडेचार कोटी रुपये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मंजूर केले. या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद आहे.
तालुका क्रीडा संकुलाचे परिसरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये आणि घडल्यास ते उघडकीस यावी यासाठी तीन वर्षांपूर्वी 24 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी वायरिंघ लावण्यात आले. तालुका क्रीडा अधिकारी यांनी वायरिंग पूर्ण झाल्याचे आणि सीसीटीव्ही कॅमेरे फिट करण्याचे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसा अहवाल पाठवायला हवा होता. मात्र हा अहवाल न पाठविल्यामुळे अजून पर्यंत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले नाही असा आरोप आता होत आहे.
सध्या तालुका क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता व स्पर्धा पाहण्याकरिता हजारो विद्यार्थी, नागरिक क्रीडा संकुलात उपस्थित होत आहे. दिनांक 19 नोव्हेंबरला अशाच गर्दीचा फायदा घेऊन तीन सायकल चोरांनी सायकली घेऊन पसार झाले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याने या चोरांचा शोध घेण्यास आता अडचण निर्माण झाली आहे. तालुका क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षेचा फायदा समाजातील असामाजिक तत्व उचलत असल्याचा आरोप होत आहे.
तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावे व या दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!