विवेकानंद विद्यालयाचा खो-खो संघ जिल्हा स्तरावर

विवेकानंद  विद्यालयाचा खो-खो संघ  जिल्हा स्तरावर

                 तालुका क्रीडा  संकुल  वरोरा  येथे  आयोजित  केलेल्या  शालेय तालुकास्तरीय  १४ वर्षाखालील खो-खो(मुली ) व १७ वर्षाखालील खो-खो (मुले )स्पर्धेत  तालुका  क्रीडा संकुल  वरोरा येथे  नियमित सराव  करणाऱ्या व  विवेकानंद  विद्यालय  वरोराच्या  विध्यार्थ्यांचा  संघ विजेते  ठरलाअसून , १४ वर्षाखालील मुलींचा व १७ वर्षाखालील मुलांचा असे दोन्ही संघ जिल्हा स्तरासाठी पात्र ठरले  आहेत.
          या  दोन्ही संघातील खेळाडूंचे सुधीर कुंभारे ,  जांभुळे सर  , स्वप्नील सायंकार व उरकांदे सर  यांचे  नियमित मार्गदर्शनाखाली  सराव घेतल्या जाते. त्या दोन्ही  संघांच्या सराव आणि परिश्रमाने मिळवलेल्या यशाबद्दल अशोक मोरे , विजय  ढोबळे , तालुका संयोजक  मुसळे संस्थेचे अध्यक्ष  टेंमुर्डे , संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे , विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  ठेंगणे  मॅडम  तसेच  सर्व  शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  अभिनंदन  केले असून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!