ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे संविधान दिवस साजरा .
तळोधी बा.;
नागभिड तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे आज संविधान ह्या दिवसाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविकांना मुलां करिता, शेंगदाणे गुड,अंड्डे,(किट) खुर्च्या वाटप करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या( पुतळ्याला) स्मारकाला माजी उपसभापती पं. स. नागभिड विजय बोरकुटे उपसरपंच नवेगाव पांडव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापीका मनिषा वासनिक आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना घेऊन गावात संविधान दिनाच्या घोषणा देत फेरी काढली .
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक कोराणकर सर यांनी केले. जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक धोटे सर यांनी बाबासाहेबांच्या संविधान लिहितांना परिश्रमानचे मुल्य पटवुन सांगितले. तर पांडुरंग रामटेके प्रतीष्ठीत नागरिक यांनी संविधानांची उद्देशिका कशी एका पेजवर आली ही पटवुन सांगितले. अंगणवाडी सेविका सरिता मेश्राम यांनी आपल्या गिताद्वारे पटवुन दिले. तिसऱ्या वर्गातील स्नेहा तिवाडे हीने संविधानाला किती दिवस लागले हे सांगितले.
अँड. शर्मिला रामटेके सरपंचा नवेगाव पांडव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात
'देशात सध्याच्या राजकीय वातावरणात संविधानाला आधारित व्यवस्था ढासळत असून संविधानिक मुल्याची पायमल्ली सरांस पणे होत असल्याचे दिसते.आधी बिल्कीस बानो च्या मारेकर्यांना मोकळे केले जाते.तर कधी आठ वर्ष वयाच्या मुलींच्या बलात्काराच्या आणि खुन्यांच्या समर्थनात सत्ताधारी पक्षाचे नेते तिरंगा रैली काढतात स्वातंत्र्याची ७५ वर्षं साजरी करतानाच जातीवाद तेवढ्याच प्रखरतेने समोर येताना दिसतो.एका चिमुकल्या ला पाणी पिल्यामुळे उच्चर्णिय शिक्षकांच्याद्वरे जिवानिशी मारण्यात येथे. तर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणार्या युवकांना मारण्यात येथे.खालच्या जातिच्या लोकांना आजही घोड्यावरून वरात काढता येत नाही ही शोकांतिका आहे आंतरधर्मीय विवाह केलेल्या "लव जिहाद ' सारखें धोंताड उभे केले जाते.आपले राजकीय नेते आपल्यालाच जाती जाती आणि धर्म यांच्यात वाटतात हे षडयंत्र आपल्याला अजून कळले नाही कारणं आपल्याला संविधान कढळले नाही .आपले हक्क,आपली देशाप्रती असलेली कर्तव्य माहीती नाहीत. त्यामुळे संविधाना विषयी जनजागृतीची करणे खुप आवश्यक आहे." असे त्यांनी सांगितले.
तर आभारप्रदर्शन जि. प.प्रा. शाळा नवेगाव पांडव.चे शिक्षिका श्रीमती मेश्राम म्याडम यांनी केले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी विद्यार्थी, गावांतील प्रतीष्ठित नागरीक, अंगणवाडी सेविका मदतनीस,आशाताई, उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय श्रीराम नवघडे शिपाई, अतुल दादाजी पांडव, ग्रामपंचायत नवेगाव पांडव यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!