आलेवाही जंगल परिसरातील रेल्वे स्टेशन व रेल्वे रुट प्लास्टिक मुक्त करण्यात आला, 'स्वाब' संस्थेचे उपक्रम.

आलेवाही जंगल परिसरातील रेल्वे स्टेशन व रेल्वे रुट  प्लास्टिक मुक्त करण्यात आला, 'स्वाब' संस्थेचे उपक्रम.
      तळोधी बा.;
           'प्लास्टिक मुक्त पर्यावरण' या मोहिमेअंतर्गत आज पुन्हा नेहमीप्रमाणे स्वाब संस्था द्वारे आलेवाही जंगल परिसरातील आलेवाही रेल्वे स्टेशन ते शिंदेवाही या भागातील रेल्वे रूट च्या बाजूला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून  संपूर्ण  रेल्वे रुट परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला.                      
              यावेळी रेल्वे स्टेशनवर प्रवासाकरिता आलेल्या प्रवाशांना पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक प्रदुषण बद्दल माहिती देऊन "प्लास्टिक कचरा रेल्वे मधुन जंगलात, पर्यावरणात कुठेही न फेकता तुम्ही कचरा पेटीत टाका. हीच आम्हाला व पर्यावरणाला तुमची मोलाची मदत ठरेल." असे सांगून प्रवाशांना मार्गदर्शन स्वाब संस्थेचे अध्यक्ष 'यश कायरकर' यांनी केले.
               विशेष म्हणजे 'स्वाब नेचर केअर संस्थे'द्वारे आपल्या परिसरात तील जंगल परिसरात असलेल्या पर्यटन स्थळी जाऊन, रस्त्याने फिरून,  जंगल परिसरातील रेल्वे रूट च्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व पर्यावरण प्लास्टिक मुक्त करण्याकरता ही  *'प्लास्टिक मुक्त पर्यावरण'* ही मोहीम सतत श्रमदानातून राबविली जाते व तो परिसर पायदळ फिरून स्वच्छता मित्रां द्वारे त्या परिसरातील संपूर्ण प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य ते विल्हेवाट लावली जाते.
                मात्र एवढे करूनही रेल्वे प्रवासी,  पर्यटनासाठी जाणारे लोक व पर्यावरण परिसरातून फिरणारे लोक,  सोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, कुरकुरेच्या पिसव्या आणि खाद्यपदार्थाच्या प्लेट्स, मोठ्या प्रमाणात रेल्वे रूट, रस्त्याच्या कडेला, जंगल परिसरातच फेकून देतात.  त्यामुळे ते खाऊन कित्येक  मुक्या प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागत असेल, तसेच पर्यावरणात हा प्रदूषण करून पर्यावरण व जंगलाचीही फार मोठी हानी होतं असते. यामुळे शासनाने, रेल्वे विभागाने,  प्रत्यक्षात पर्यावरणामध्ये असलेल्या प्लास्टिक प्रदूषणाबद्दल गांभीर्याने विचार करून, पर्यावरण रक्षणासाठी यावर तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे.
              यावेळी स्वच्छता मित्र म्हणून *छत्रपती रामटेके,  विनोद लेंडगुरे,  जीवेस सयाम, आकाश मेश्राम, तुषार शिवनकर,  विकास लोनबले, महेश बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, हितेश मुंगमोडे, प्रतिकार बोरकर, प्रशांत सहारे ,स्वप्निल बोधनकर , यश कायरकर* या 'स्वाब' संस्थेचे सदस्य तथा स्वच्छता मित्रांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!