असं होऊन कसं चालेल?



आज चौथ्या वर्गाच्या परीक्षांपासून तर बारावीच्या परीक्षा चीटिंग असतेय विद्यार्थ्यांची. नवोदय, शिष्यवृत्ती, संगणक अशा अनेक परीक्षात चीटिंगच. आता मला एक प्रश्न पडतो की विद्यार्थी चीटिंग करून लिहितात चीटिंग केलेली नक्कीच ओळखता येते पण तरी देखील त्यांना उत्तम गुण मिळतात. यास शिक्षक जबाबदार आहेत असे नाही पण जर परीक्षा सेंटरवर कडक व्यवस्था केली चीटिंग होणारच नाही. आणि प्रामाणिक विद्यार्थी चांगल्या गुणांपासून वंचित राहणार नाही.
आता कोणी कोणी म्हणतात की चीटिंग करून देखील मोठे होऊन त्यांना काहीच येणार नाही, मग शिकायत करायची काही गरज नाही. अहो पण आज एका प्रामाणिक आणि हुशार असलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेत 96% मिळाले, आणि चीटिंग केलेल्या विद्यार्थ्याला 98% मिळाले आणि आज त्या विद्यार्थ्याचे मोठे मोठे बॅनर देखील लागले. आज नोकरी सुद्धा मिळत असेल तर टक्के पाहूनच आणि अशा प्रकारे जर कुठला विद्यार्थी इंजिनियर झाला तर देशाची प्रगती कुठवर.
मग हे असं होऊन कसं चालेल आज विद्यार्थी परीक्षा चीटिंग करतातच परंतु शिक्षक सुद्धा त्यांना पाठिंबा करतात म्हणजे नवोदय, शिष्यवृत्ती ,संगणक परीक्षा असली की शिक्षक विद्यार्थ्याकडे जातात माझ्या शाळेतील विद्यार्थी म्हणून उत्तरे सांगतात केवळ शाळेचे नाव होण्यासाठी मग काय विद्यार्थ्यांचा नंबर लागतो नवोदयला अगदी पात्रता नसताना. मग हे असं होऊन कसं चालेल म्हणून अगदी कडक व्यवस्था चौथी ते बारावी व अन्य परीक्षा सेंटरवर करायला हवे या गोष्टीत शिक्षकांना प्रामाणिक राहायला हवे आणि विद्यार्थ्याला सुद्धा. हे एका विद्यार्थिनीचे मत आहे.

कु. समीक्षा भिमराव रामटेके 
मूल जिल्हा चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!