नवभारत कन्या विद्यालयात मॅजिक बसचा उपक्रम
नवभारत कन्या विद्यालय मुल येथे आज, बालक दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
आज बालक दिनानिमित्त मॅजिक बस या संस्थेच्या वतीने खेळातून शिक्षण या उपक्रमाद्वारे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थिनींना क्रिकेटचे नियम अटी समजून सांगण्यात आले. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, विस्तार अधिकारी कु. जयश्री गुज्जनवार, वर्षा पिपरे, मुख्याध्यापिका सौ. मंगला सुंकरवार, केंद्रप्रमुख प्रमुख प्रमोद कोरडे, गुरुदेव सेवा मंडळाचे सुखदेव चौथाले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मॅजिक बसचे अधिकारी अरुण मोहिते यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!