जुनासुर्ला येथे मॅजिक बसच्या वतीने कबड्डी सामने
मूल (प्रतिनिधी)
दिनांक 11नोव्हेंबर 2022 रोजी कॅडबरी डेअरी मिल्क सहकार्याने " गुड लक गर्ल " या ब्रीद वाक्य घेऊन स्पोर्ट्स फाॅर गर्ल प्रोग्राम अंतर्गत मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर च्या वतीने Village Girls sports cabinet
Inter village kabaddi Sports tournament मौजे गाव जुनासुर्ला ग्रामपंचायत सरपंच रंजित समर्थ यांच्या सहकार्याने श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला शाळेच्या मैदानावर सहा टीम च्या कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून मा. वैभव खांडरे साहेब (पंचायत समिती मुल तालुका )व मा. सौ. गुज्जनवार मॅडम (विस्तार अधिकारी पंचायत समिती मुल तालुका) मा सरपंच श्री रंजित समर्थ ग्रामपंचायत जुनासुर्ला तसेच श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला मुख्याध्यापक श्री बी बी रोहनकर हे उपस्थित होते.
मा सरपंच रंजित समर्थ ग्रामपंचायत जुनासुर्ला हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन मा वैभव खांडरे साहेब यांनी केले
या वेळी सहा टीम सहभागी होऊन कब्बडी स्पर्धा घेण्यात आल्या जुनासुर्ला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती मैदानावर खुप गर्दी झाली होती
झालेल्या सामन्यात मुलींची गडीसुर्ला कब्बडी टीम प्रथम क्रमांक पटकावला आहे
द्वितीय क्रमांक जुनासुर्ला कब्बडी संघाला मिळाला
तृतीय क्रमांक खालवासपेठ या मुलीच्या संघाला मिळाला
या वेळी उत्कृष्ट चढाई
आणि उत्कृष्ट पकड हे बक्षीस पण देण्यात आले
या वेळी जेवण, पाणी, मंडप व्यवस्था मा रंजित समर्थ ग्रामपंचायत सरपंच जुनासुर्ला यांनी केली होती
श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुर्ला मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
माजी शिक्षक यांनी वैयक्तिक बक्षीसे दिली त्यामुळे मुलींचा उत्साह वाढला तसेच मुलींना मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी तसेच व्यायाम करून शरीर सुदृढ निरोगी राहण्यासाठी खेळ आवश्यक आहे
गाव खेळ समिती स्थापन करण्यात आली आहे
या वेळी मॅजिक बस चे सर्व मॅनेजर व स्कूल सपोर्टिव्ह आॅफिसर उपस्थित होते
Mondelez S4G GLG Phase 2 च्या सर्व कोच निलम वर्मा, कोमल पचारे, विद्या तामखने, रिमा कुशवाह, पौर्णिमा चांदेकर,शितल बोरकर यांनी खुप मेहनत घेतली आणि अरूण मोहिते प्रोजेक्ट लीड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!