जांभुळघाट-भिसी राज्य मार्ग डांबरीकर रोड चे काम चालु असतानाच पडले खड्डे

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालुक्यातील जांभुळघाट ते भिसी नव्या डांबरीकरण रोड चे काम मागील ५ ते ६ महिन्या पासुन सुरू आहे.डांबरीकर रोड काम सुरू असताना तात्काळ रोड दबत असल्याने खड्डे पडायला सुरूवात झाली आहे.आताच अश्या प्रकारची सुरूवात असेल तर समोर या रोड चे काय हाल होणार ? कंत्राटदार  रोड चे  काम  इंस्टीमेट नुसार करीत आहे का  असा ? चिन्ह दिसत जर इंस्टीमेट नुसार काम तरी कसे म्हणावे असे प्रश्न निर्माण होत आहे.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार होत असल्याचे दिसुन येत आहे.रोडचे खोदकाम करण्यात आले नाही.फक्त त्याच्यावर किट्टी व मटेरीयल टाकून डांबरीकरण केल्याचे दिसुन येत आहे.रोड ची दबाई करण्यात आली नाही,पुलाच्या बांधकामात कधीही पाणी मारतानी कंत्राटदार दिसतच नाही.यावर अभियंताचे किंवा अधिकाऱ्यांचे किती कामा वर देखरेख आहे हे दिसुन येत आहे. कंत्राटदाराचे मोठ्या राजकीय पक्षा च्या मोठ्या नेत्या बरोबर घनिष्ठ संबध तर नाही ना ? त्यामुळे कंत्राटदार हे अभियांत्या वर दबाव टाकुन आपला काम करून घेत तर नाही ना ? कारण बरेच अधिकारी किंवा कर्मचारी दबावात काम करीत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे या रोड च्या कामाची चौकशी वरीष्ठा कडूण झाली तर कामाची सत्यता बाहेर येणार यात काही शंका नाही . इंजिनिअर आणि अधिकारी यांचे असेच दुर्लक्ष होत राहिले तर जीवितहानी होणे टाळता येणार नाही म्हणून वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!