नवेगाव पांडव येथे बिरसा मुंडा जयंती व आधार कार्ड चे शिबिर आयोजित.
तळोधी (बा.)
आज बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागभीड च्या वतीने सर्कल -नवेगाव पांडव बिट अंतर्गत ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे आधार कार्ड चे शिबिर आयोजित करण्यात आले. या निमित्ताने झिरो ते सहा वर्ष वयोगटातील २२ मुलांचे आधार कार्ड बनविण्यात आले.
ह्या आधार कार्ड शिबिराचे उद्घाटन मा.ॲड.शर्मिला रामटेके सरपंच ग्रामपंचायत नवेगाव पांडव यांचे हस्ते करण्यात आले. ह्यावेळेस कार्यक्रमाच्ये वतीने श्रीमती विभावरी तितरे सहा.बा.वि.प्र.अ. उपस्थित होत्या.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीमती पुष्पा मेश्राम, श्रीमती सरिता मेश्राम, श्रीमती आशा फुकट, अंगणवाडी सेविका, मदतनीस नवेगाव पांडव व मिंथूर, तसेच ग्रामपंचायतील सर्व कर्मचारी विजय श्रीराम नवघडे(शिपाई)अतुल दादाजी पांडव (पाणी पुरवठा),धनराज अलोने (संगणक) सोमेश्वर पांडव (रोजगार सेवक ) यांनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!