शहरात मालधक्का तयार करण्यासाठी कथित नेत्यांनी पन्नास लाख घेतल्याची चर्चा



मुल येथील मालधक्का विरोधात आंदोलनाला गती मिळून, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला मालधक्का इतरात्र करण्याबाबत निर्देश देताच, मालधक्क्याशी संबंधित कंत्राटदारांनी मुल येथील काही राजकीय शक्तीसोबत अंतर्गत संधान साधून आणि आर्थिक व्यवहार करून मालधक्का मूल शहरात झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. या कामासाठी ॲडव्हान्स म्हणून पन्नास लाख रुपये दिल्याचीही चर्चा आहे.
मालधक्क्याच्या कंत्राटदाराला दिलेल्या शब्दांनुसार, पैसे घेणारा संबंधित नेता आपल्या कार्यकर्त्याच्या मार्फत गावात मालधक्का झाला पाहिजे यासाठी सह्या घेणे जनमत करणे असे प्रयत्न सुरू केल्याचे ही माहिती आहे. मालधक्का विरोधात आंदोलन करणाऱ्यांपैकी काहींना या "नेत्यांनी" अमिष दाखविल्याची ही माहिती आहे.
उल्लेखनीय म्हणजे मागील अनेक वर्षापासून हा राजकीय नेता मूल च्या कोणत्याही सामाजिक प्रश्नावर गप्प राहणे पसंत केले होते. मूल शहरात करोडो चा व्यवहार असणारी कंपनी येताछ मात्र हा नेता ऍक्टिव झाल्याचीही चर्चा आहे.
सुरजगड येथून हजारो मोठ्या ट्रक द्वारे शहरात लोहखनिज आणून रेल्वे स्टेशन परिसरात डंपिंग करणे आणि जेसीबी द्वारे रेल्वेच्या वॅगन मध्ये टाकणे एवढेच काम होणार आहे. यात स्थानिकांना कोणताही रोजगार मिळणार नाही. याची पुरेपूर माहिती असतानाही, मुल येथील एका बड्या राजकीय नेत्यांनी मालधक्क्याची संबंधित कंत्राटदाराकडून लाखो रुपये घेत, मूल शहरात मालधक्का झाला पाहिजे यासाठी मालधक्का झाल्यास मूल शहरातील लोकांना रोजगार मिळेल असे खोटे आश्वासन देऊन, त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या भागात लोह खनिजाचे उत्खनन सुरू आहे त्या भागातील कोणत्याही स्थानिकांना एक रुपयाचाही रोजगार मिळाला नाही त्यामुळे तेथील नागरिक आधीच संतप्त आहेत व वारंवार आंदोलन करीत आहे ही वस्तुस्थिती असताना, केवळ लाखो रुपयाच्या आर्थिक लाभासाठी मालधक्का मूल शहरात झाल्यास रोजगार मिळेल अशी खोटी चर्चा रंगविली जात आहे.
मूल शहरात मालधक्का झाल्यास, केवळ झाडू मारणारे आणि एक टँकरने पाणी टाकणारे, एवढ्या तीन चार लोकांनाच काम मिळणार आहे, मात्र यासाठी चाळीस हजार नागरिकांच्या आरोग्याचा बळी द्यावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती माहिती असतानाही केवळ आर्थिक अमिषा पोटी आणि राजकीय विरोधासाठी शहराची वाट लावण्याचा पाप हे नेते करीत असल्याचा आरोप होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!