तळोधी (बा.) येथे अनेक विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

तळोधी (बा.) येथे अनेक विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
    आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या शुभहस्ते विविध योजनेअंतर्गत  विकासकामांचे भूमिपूजन संपन्न. 
    तळोधी (बा.) 
           आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या हस्ते विविध योजनेअंतर्गत नागभीड तालुक्यातील तळोधी बा.येथे विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.   या विकासकार्याबद्दल आमदार यांचा आभार मानून विशेष स्वागत व शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
 यामध्ये तळोधी मध्ये लाखो रुपये खर्च करून कामं केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     खनिज विकास निधी योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील श्री. रमेश मोटघरे ते ग्रा.पं. बोरवेल पर्यंत सि.सि. रोड बांधकाम करणे. (कामाची किंमत रु. ५.०० लक्ष)
    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील ३) जि.प. प्राथ शाळा येथील आवारात पेवर ब्लॉक बसवणे.
      महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील १) हनुमान मंदीर नवानगर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे २) वस्ती शाळा नवानगर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे.
      इतर ग्राम विकास योजना अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील रामदास कामडी ते नवानगर पाण्याच्या टाकी पर्यत सि. सि. रोड बांधकाम करणे पंडीत मदनकर ते दामोदर मदनकर पर्यत सि. सि. रोड बांधकाम करणे.
       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील १) टिळक चौक येथे सिमेंट कॉक्रेटीकरण बांधकाम करणे, २) बंडु सरपाते ते दिवाकर आंबडारे सि.सि. रोड बांधकाम करणे.
       खनिज विकास निधी योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील भट्टी वार्ड ते सोनवाट सि. सि. रोड बांधकाम करणे. कामाची किंमत रु.१०.०० लक्ष.
        खनिज विकास निधी योजने मौजा तळोधी (बा.) येथील श्री. सुनिल वारवे ते घोडाझरी नहर बंदीस्त नाली बांधकाम करणे. कामाची किंमत रु. १०.०० लक्ष.
       महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील १) घोडाझरी नहर ते महात्मा फुले चौक येथे सि.सि. रोड बांधकाम करणे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजने अंतर्गत मौजा तळोधी (बा.) येथील धकाते वस्त्रालय ते दत्त मंदीर येथील सि. सि. रोड बांधकाम करणे.
       या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, माजी नगरसेवक सतीश जाधव, सरपंच्या छाया मदनकर, उपसरपंच राजेश घिये, भाजयुमो चिमूर तालुका महामंत्री रोशन बन्सोड, भगवान देशमुख, संजय डफ, रमेश बावनकर, चांगदेव कामडी, वसंतराव बडवाईक, सुरेखा कामड़ी, अर्चना कामडी, पद्मा कामडी, कल्पनाताई मस्के, इंदुताई आंबोरकर, नरेश खोब्रागडे, सुधाकर कामडी, विष्णुजी देशमुख, अतुल कामडी, अनिकेत नरखेड व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!