पवनीचा ऐतिहासिक दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील तसेच विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहरात पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माँ चंडिका देवस्थान व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष बंडू बावनकर यांच्या पुढाकाराने व पोलीस अधीक्षक लोहिद मतानी प्रमुख उपस्थितीत पवनीचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.या दसरा सोहळ्यामध्ये नऊ आखाडे व १३ झाकी यांचे शहरातून प्रदर्शन होऊन माँ चंडिका देवस्थान परिसर शिवकालीन युद्ध कलांचे त्याचे प्रदर्शन झाले , रावण दहन झाले सोने लुटताच व पवनीवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.तत्पूर्वी शहरातून विविध विषयांवर सुंदर देखावे तयार केलेल्या झाक्यांचे लवाजम्यासह प्रमुख चौकांमध्ये आगमन झाले. यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहिद मतानी यांचे माँ चंडिका देवस्थान राजू ठक्कर बंडु बावनकर, स्वराज्य पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण भंडारा जिल्हाध्यक्ष शेखर जिभकाटे स्वराज्य पोलिस मित्र वपत्रकार संरक्षण प्रवक्ता किशोर जुमळे ,मोहन पंचभाई, मोहन सुरकर माजी नगरसेवक नरेश बावनकर इतर सदस्यांनी स्वागत केले . यावेळी पोलीस विभाग व आरोग्य विभाग गृहरक्षक दल आम आदमी पार्टीचे स्वयंसेवक. उत्कृष्ट सेवा देऊन सहकार्य केले . यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. पंचक्रोशीतून आलेले नागरिकांनी एकमेकांना सोने दिले. नागरिकांनी त्यांना सोने दिले.या सोहळयास व्यापारी संघाचे अध्यक्ष देवराज बावनकर, माजी उपाध्यक्ष नरेश बावनकर , विजय मुंडले देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, यांच्या सहकार्याने नियोजन व यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा उत्सव थाटात पार पडला.शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटला भरघोस प्रतिसाद जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीट'ला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.रस्त्याच्या दोन्ही बाजूस खेळणीचे ,फळांचे खाद्यपदार्थांचे व इतर वस्तूंचे दुकाने लागली होती. या शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीटमध्ये बचत गटाच्या माध्यमातून विविध कलावस्तुंचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलवर वस्तू खरेदी व पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थिती सजवलेले झाकी, , चित्ररथ, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, शाही लवाजम्यातील मिरवणुकीने
नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.तसेच या मिरवणुकीत चोख पोलीस बंदोबस्त होमगार्ड पथक यांच्या अथक परिश्रमाने शांतता व सुव्यवस्था कायम ठेवत आनंदात हा सोहळा पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!