डिजिटल मीडिया असोसिएशनने घेतली पोलीस अधीक्षक परदेशी यांची भेट
डिजिटल मीडिया असोसिएशन तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार
चंद्रपुरात नुकतेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी त्यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र चोरडिया तसेच विजय सिद्धावार यांनी पोलीस अधीक्षक परदेशी यांना माहिती देताना सांगितले की, सोशल मीडिया चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून कार्यरत असून डिजिटल मीडिया द्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, आणि त्यातून वाचकांना मिळणारा भरभरून प्रतिसाद सोशल मीडिया वाढत असून. यामुळे सोशल मीडियाचे महत्व वाढल्याचे नमूद केले. शहरात होणाऱ्या समस्या, तसेच गुन्हेगारीवर आळा घालावा. शहरातील सुव्यवस्था, शहरातील वाहतूक कोंडी व इतर समस्या बाबत पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रशासन पोलीस प्रशासनाला पत्रकारांची साथ, तसेच पोलीस विभागातून निघणाऱ्या बातम्या प्रसारित करणे व जनतेला शांतता व सुव्यवस्था बाधित राखण्याचे कामही पोलीस विभागाबरोबर पत्रकाराची मुख्य भूमिका असते. असे जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी डिजिटल मीडिया असोसिएशनचे जितेंद्र चोरडिया, विजय सिद्धावार, राजू बिट्टूरवार, जितेंद्र जोगड, दिनेश एकवणकर, अरुण वासलवार, तुळशीराम जांबुळकर, दीपक शर्मा, मनोहर दोत्तपल्ली, राजेश नायडू, मुन्ना तावाडे, धम्मशील शेंडे, नरेंद्र डोंगरे, प्रशांत रामटेके, तनशील पठाण, संपादक, पत्रकार, संघटनेचे सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!