युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था मुल चे निखिल वाढई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध वस्तूंचे गरजूंना वितरण
मूल :- ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाला एक विस्तृत परिवार समजून त्यातील कमकुवत वर्गाला आपल्या कर्तुत्वाने काही परतफेड करण्याच्या भावनेतून आज गरजू विद्यार्थ्यांना युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेमार्फत श्री निखिल वाढई यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लांकेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था मुल या संस्थेला एडवोकेट प्रवीण लाटकर सर यांच्या तर्फे देणगी स्वरुपात मिळालेले साहित्य श्री. निखिल वाढई यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले.* ससामाजिक उपक्रम राबवणे हाच वाढदिवस साजरा करण्या चा उद्देश असतो.थंडीची चाहूल लागताच गरजवंत लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते,परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकूडणेच येते. समाजातील अशाच काही गरजू वंचीत, लोकांना युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था च्या वतिने थंडीपासून बचाव व्हावी म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची उब दिली आहे. रात्रीच्या सुमारास थंडीत कुडकूडणाऱ्या निराधाराना अचानक अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनीआनंद व्यक्त केला. तसेच होतकरू शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे मुला-मुलींच्या चेहर्यावरील हास्य फुलल्याने आपला वाढदिवस खर्या अर्थाने साजरा झाला. शैक्षणिक साहित्याचे वाटप करत होतो, करत आहे आणि यापुढेही अविरतपणे करत राहू; ज्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल व त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेण्याकरता आमचा खारीचा वाटा म्हणून हातभार लागेल” असे उद्गार श्री निखिल वाढई यांनी आपल्या भाषणात नमूद केलें.तसेच युवा क्रांती संस्थे तर्फे Adv. प्रवीण लाटकर सर यांचे धन्यवाद करण्यात आले.
यावेळी संस्थेचे निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुरज गेडाम, निहाल गेडाम, सौरभ वायडे,साहिल खोब्रागडे, अंकित कटकेल्लावर, अमित चलाख, सुधीर वाढगुरे आदि उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!