वन्यजीव सप्ताह निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन...
शेगाव.... जगदीश पेदाम
इथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अर्जुनी तुकुम येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर (कोर) व वनपरिक्षेत्र ताडोबा यांच्या अंतर्गत वन्यजीव सप्ताह कार्यक्रमानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणावर करण्यात आले होते..
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा सतीश शेंडे,भानुसखिंडी वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी नन्नावरे, वनरक्षक प्रणय कोसुरकर यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक गेडाम सर यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये वर्ग सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला असुन या वेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तामगाडगे सर, गौरकर मॅडम, बुजाडे मँडम,वन्यजीव प्रेमी जगदीश पेंदाम, संदीप नन्नावरे,दिनेश जुमनाके, वैभव वांढरे, वनमजुर कर्मचारी उपस्थित होते.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!