वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
आज चंद्रपूर तालुक्यातील महादवाडी येथे वाघाने हल्ला केल्यानंतर गुराखी ठार झाल्याची घटना घडली.
शामराव जुमनाके वय ५० वर्षे असे ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
शामराव हा आपले जनावरे चरण्याकरिता गावालगाच्या जंगलात गेला होता. तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने श्यामराव वर झडप घातली आणि त्याला जागीच ठार केले.
ही घटना माहिती होताच गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली असून, वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!