स्वच्छता ही सेवा "आणि "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" कार्यक्रम संपन्न
(यश कायरकर,) नागभीड ;
ग्राम पंचायत नवेगांव व प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत नवेगाव पांडव कार्यालय येथे *स्वच्छता ही सेवा* "आणि *माता सुरक्षित तर घर सुरक्षित* कार्यक्रम साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमांचे अध्यक्ष मान.श्री.शंकरराव उराडे सर माजी मुख्याध्यापक ने. हि. हाय. ब्रम्हपुरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महा.राज्य ग्रामीण अभियानाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक सुधीर राजगडकर ,तालुका आरोग्य अधिकारी नागभिड डॉ.विनोद मडावी , धर्मराज कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती चावरे मॅडम, जि. प. प्रा. शाळा मुख्याध्यापीका मनिषा वासनिक मॅडम, डॉ ममता पत्रे, डॉ पल्लवी गलगट, ने.ही.विद्यालयांचे मुख्याध्यापक पुरूषोत्तम ठाकरे,नवेगाव पांडवचे उपसरपंच मा.विजय पंढरीनाथ बोरकुटे , डॉ.प्रशांत पांडव, डॉ मेश्राम सर, डॉ.सेलोकर सर, डॉ.वैभवी काटेखाये म्याम, डॉ.बालपांडे मॅडम, अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताईं,प्रा,आ.के.आ.सहाय्यक , आरोग्य सेवक, सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अनुशंगाने डॉ.ममता पत्रे यांनी महिलांनी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता पाळावी असे महिलांना आवाहन केले.सुधीर राजगडकर यांनी अत्त दीप भव या संदेश सांगत स्वच्छता ही स्वतःपासून सुरु होते आणि नंतर तिचे स्वरूप वैश्विक होते असा संदेश दिला. श्रीमती पापिता चावरे यांनी महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रास्ताविक पर भाषणात ॲड. शर्मिला रामटेके यांनी झाडांची लागवड, व्ययस्करांचा सांभाळ, गावातील स्वच्छता व आरोग्य यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. शंकरराव उराडे यांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या 18 वर्षांवरील शाळकरी विद्यार्थिनी व महिलांसोबत व्यसनमुक्तीसाठी आपल्या भाषणातून चर्चा केली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ने.ही. विद्यालयातील शिक्षक श्री सतिश डांगे यांनी संचालन केले.तर डॉ.पल्लवी गलगट यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!