कृषी विषयक प्रशिक्षणाने विद्यार्थी उत्साहीत

नवभारत कनिष्ट महा.त कृषी विभागाचा  कृषीपुरक उपक्रम

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - शाशन स्तरावरून कृषी विभागामार्फत विवीध योजना सभा,मेळावे,संदेशफलक,वुत्तपत्रे,आकाशवाणी याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कायं करीत असतो. ग्रामिण भागात शालेय विद्यार्थी यांनाच शेतीपुरक प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांचे घरीच योजना व ज्ञान पोहचविण्याचे उदिष्ट ठेवून येथील कृषी पयंवेक्षक दिनेश पानसे यांच्या कल्पनेतून शालेय विद्धाथी यांनाच माध्यम बनविण्याचे उपक्रम संपुर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असून त्याची सुरवात व्याहाड(बु.) येथील नवभारत विदया. व कधिष्ट महा.येथे प्रबोधन,प्रशिक्षण
व प्रात्यक्षिकाद्धारे करण्यात आली.दिनेश पानसे यांनी यावेळी पिकांवरील किडरोग,त्यावरील उपाययोजना, शेंद्रिय शेती,शेंद्रिय खते,जैवीक खते,हिरवळ खते,गांडूळ खते, फवारणी, दुष्परिणाम,ध्यावयाची काळजी,विवीध योजना,ई पिक पाहणी व शेतकऱ्यांना मदत यावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी आंबा व बोर कलमीकरण करून दाखविण्यात आले.विद्धाथीय यांनी यात उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.याप्रसंगी क .महा. चे प्राचार्य भगत,सवं प्राध्यापक व शिक्षक वृंद उपस्थीत होते. कृषी विभागाचे काळे,मेश्राम,पवन ठाकरेयांनी सुद्धा प्रबोधन केले.संचालन शेंडे यांनी केले.सदर प्रबोधनान परिसरातील शेकडो विद्धाथी क्रुशिपुरक् ज्ञान घेऊन उत्साहीत झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!