स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स वर आली उपासमारीची पाळी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेला राष्ट्रीय प्रकल्प म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प याठिकाणी देश विदेशातील पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असून वाघाच्या रक्षणासाठी विशेष पथकाची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली आहे. ती म्हणजे STPF ची परंतु या पथकास विविध ठिकाणी निवाऱ्याची सोय नाही.अनेक महिन्यांपासून वेतन नाही.असे असतांना (STPF) स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स ला जीवन जगणे कठीण झाले आहे.दैनंदिन जंगलामध्ये जीवाची पर्वा न करता अतिदक्षता असलेल्या ठिकाणी जाऊन वनांचे व वन्यप्राण्यांचे रक्षण करावे लागत असून जर वेतनाअभावी काम करावे लागत असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे. याकडे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, वनमंत्री , मुख्यमंत्री , उप मुख्यमंत्री यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्यासारखे दिसून येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!