तळोधी बा. येथे कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीसांनी केला लाँगमार्च


यश कायरकर

तळोधी बा : - गणपती विसर्जनासाठी सज्ज असणाऱ्या नागरिकांनी शांततेत गणपती विसर्जन करावे. व येणाऱ्या उत्सवात गाव परिसरातील जनतेने कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन शांतता भंग करू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब व तळोधी बा.चे ठाणेदार दिनकर शेंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तळोधी पोलीस स्टेशन येथून सकाळी लाँगमार्च काढण्यात आला. यावेळी तळोधी बा. येथील मुख्य मार्गाने बाजार चौक, मज्जीद रोड, गोवर्धन वार्ड, झेंडा चौक अशा मार्गाने लाँगमार्च काढण्यात आला. या वेळी चंद्रपूर येथील आर. सी. पी. पथक चे जवान सहभागी झाले होते. तसेच तळोधी पोलीस येथील सर्व अधिकारी वर्गासहीत कर्मचारी दाखल झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!