सावरी गावात घोणस अळीची शेतकऱ्यांमध्ये दहशत
स्पर्श होताच शरीरात होतात वेदना
गवतामध्ये असते वास्तव
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - एका शेतकऱ्यास घोणस अळीचा स्पर्श झाला असून चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथिल शेतकरी महीला कलावती रामदास मुंढरे सावरी शेत शिवारात यांची शेती असून शेतात गवत कापत असताना अळीचा स्पर्श झाला शरीरात वेदना व्हायला लागल्यामुळे त्यांना वरोरा येथे उपजिल्ह रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे घोणस अळीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर यांच्यामध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यात सोयाबीन, कपाशीची शेतकऱ्यांनी लागवड केली .मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात असलेले पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. सोयाबीनला शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीवर बोडअळीचा आक्रमक सुरू आहे.त्यामुळे पाहीजे तसे उत्पादन होईल की नाही, चिंतेत शेतकरी सापडला आहे.चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर गावांमध्ये घोणसअळी आढळून आली आहे.त्यामुळे शेतक-यांसह मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे .ही अळी पिकांचे नुकसान करीत असली तर नकळत तिचा स्पर्श झाला की शरिराला वेदना मोठ्या प्रमाणात होतात.व या घोणस अळीमुळे शेतकरी शेतमजूर अडचणीत सापडला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!