ई - पीक पाहणीसाठी प्रहार सेवक शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रहार सेवक विनोद उमरे शेतकऱ्यांची ई - पीक पाहणीसाठी करत आहे धडपड
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शेतकऱ्यांच्या जमिनीवर लावलेल्या पिकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने स्मार्टफोनच्या द्वारे शेतकऱ्यांनी करायचे आदेश दिले आहेत, शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना ई पीक पाहणीचा डोकेदुखी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क नाही या समस्या लक्षात घेउन प्रहार सेवक विनोद उमरे व त्याचे सहकारी मागील वर्षी पासून शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले आहे
प्रहार जनशक्ती पक्षचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः ई पीक नोंदणी करून देतं आहे .या सर्व प्रहार सेवक यांनी सहकार्य केले प्रहार सेवक, ऋतिक जांभूळे , सुशांत खोब्रागडे,विक्की भटवलकर,मुरलीधर रामटेके,माणिक मत्ते,अशिंद मेश्राम,नारायण निखाडे, या सर्व प्रहार सेवक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी नोंदनी करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!