आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न ...
शेगाव (जगदीश पेंदाम)
वरोरा तालुक्यातील पो. स्टे. शेगाव बु. तर्फे आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन शिवम सभागृह शेगाव या ठिकाणी करण्यात आले होते..
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लाभलेले उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे चिमूर ,तर प्रमुख अतिथी आयुष्य नोपाणी (IPS) उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी upsc exam बाबत तसेच स्पर्धा परीक्षा बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले..
स्पर्धा परीक्षा पास करण्या करीता सातत्य , हिम्मत, जिद्द, शिक्षण असणे आवश्यक आहे असे नमूद केले सोबत त्यांनी त्यांच्या जीवनाती अनुभव (experience ) विद्यार्थी सोबत या वेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती म्हणून राजेंद्र प्रत्येकी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पालडोह (365 दिवस चालणारी शाळा यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला...
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पो.स्टे. शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलिस अमलदार प्रदीप मोंढे यांनी केले, आभार नीभ्रट (पोलिस पाटील कोटबाळा) यांनी केले कार्यक्रमात परिसरातील जवळपास 350 वर विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!