दुहेरी अपघातात सावरला येथील १ मृत तर ४ जख्मी.
दुहेरी अपघातात सावरला येथील एकाचा मृत्यू तर चौघे जखमी (तळोदी बालापुर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.)
तळोधी बा;
दुहेरी अपघातात सावरला येथील इसमाचा मृत्यू तर चौघे जखमी (तळोदी बालापुर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना.)
नागभीड तालुक्यातील सावर्ला येथील अंकुश बारसागडे ३0 हा कावीळ औषध घेण्यासाठी तळोधी बा. ला आपल्या दुचाकी क्र. MH -34- BY -2745 ने येत असताना
नदीच्या समोरील मोडीवर अज्ञात चार चाकी वाहनांना वाचवण्याच्या प्रयत्नात ८ वाजताच्या दरम्यान बोकोडोह नाल्या जवळील कबाडी दुकाना जवळ सिमेंट च्या खांबाला दुचाकीला धडक दिल्याने सावर्ला येथील सुधाकर सयाम वय ५० वर्ष व अंकुश बारसागडे वय ३० रा. सावर्ला हे दोन्ही गंभीर जखमी झाले. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या गावातील इसमांनी त्यांना आपल्या दुचाकी वाहनाने तळोदी येथील दवाखान्यात नेत असताना. तळोधी कडुन आकापूरकडे जाणारे दुचाकी वाहन क्रमांक MH -34- CB- 6757 ने जबर धडक दिली .
सदर दुहेरी अपघातात सावरला येथील निवासी सुधाकर सयाम 50 याचा मृत्यू झाला. तर जखमी मध्ये, अंकुश बारसागडे, प्रकाश नैताम चंद्रपूर, ज्ञानेश्वर श्रीराम मडावी , मांगली (अरब) व काशीनाथ पुराम (आकापुर ) हे गंभीर जखमी झाले असून तळोधी बा. येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळतात तळोदी बाळापूर येथील पोलीस घटनास्थळी जाऊन मोक्का पंचनामा केला. सदर मृतकास शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले.
तळोधी बा. पोलीस स्टेशन ठाणेदार डी. आर. शेंडे यांचे मार्गदर्शनात तळोधी पोलीस तपास करीत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!