सावरगाव येथे बैलांचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा.

सावरगाव येथे बैलांचा सण पोळा मोठ्या उत्साहात साजरा.
तळोधी बा.;
 नागभीड तालुक्यातील  सावरगाव येथे आज पोळा निमित्त बैलांचा सण  हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.‌
पावसाळी शेतीचा हंगाम झाल्यानंतर येणारा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात . त्यानंतर त्याकरिता आपल्या शेतीच्या कामातील बैलांना रंगाने रंगवून व सजवून पोळ्याकरिता गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये संपूर्ण गावातील  शेतकरी आपापल्या बैल जोड्या घेऊन जमा झाले. त्यानंतर तिथून पुढील  पूजनाची सुरुवात करण्यात आली.
 पोळा  झाल्यानंतर संपूर्ण शेतकरी आपापल्या बैल जोड्या घेऊन गेले. हा संपूर्ण पोळ्याचा सण गावात शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!