काजळसर येथे महिलेचा विनयभंग, आरोपीवर ऍट्रासिटी ऍक्ट सहित गुन्हे दाखल
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - नेरीवरुन जवळच असलेल्या काजळसर येथे एका महिलेला घरात एकटीच स्वयंपाक खोलीत झोपून असल्याचे बघून घरात प्रवेश करीत महिलेचा विनयभंग केला सदर प्रकरणी महिलेंनी चिमूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करताच पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. सविस्तर वृत्त असे दि. २६ ऑगस्टला काजळसर येथील आरोपी प्रशांत मनोहर सोनवाने वय ३५ वर्षे यांनी गावातील एका महिलेला घरात एकटीच असल्याचे बघून घरात प्रवेश करीत स्वयंपाक खोलीत झोपून असलेल्या महिलेच्या अंगावर बसून दोन्ही मनगट घट्ट पकडून विनयभंग केला यात महिलेने आरोपी च्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रशांतने तीला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला असता ती सरळ समोरच्या भिंतीवर आढळल्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली आणि बाहेर पळाली रात्र असल्याने महिलेने दुसऱ्या दिवशी चिमूर पोलीस स्टेशन गाठीत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम ४५२ , ३५४ ,३२३ भांदवी सहकलम ३ (१) अ जा ज आ प्र का २०१५ अंतर्गत गुन्हे दाखल करीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!