सावरी (बिड) येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे दुर्गा माता मंडळ व समस्त गावकरी यांच्या वतीने गेल्या २५ वर्षा पासुन सावरी या गावी तान्हा पोळा साजरा केला जाते.त्याच प्रमाणे याही वर्षी सावरी गावात परंपरेनं चालत आलेला हा तान्हा पोळा साजरा करण्यात आला.या तान्हा पोळ्यामधे मध्ये २३१ नंदी सहभागी झाले होते. आनंदाने गोविंदाने हा तान्हा पोळा साजरा झाला.लहान मूल मुली यांनी अनेक विविध वेशभूषा परिधान करून लाकडी नंदी ला सजवून भारतीय संस्कृती जपली.या तान्हा पोळ्यात माकोना येथील जय भोले भंजन मंडळ यांनी सहभाग घेतला.या तान्हा पोळ्यात बालगोपाल यांना बिस्कीट, चॉकलेट चे वाटप करुन वर्ग १० व १२ वी मध्ये प्रथम क्रमांक द्वितीय , तृतीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. ईश्वर चिट्ठी च्या मध्यामने तान्हा पोळ्यातील बालगोपाल यांना बक्षीस देऊन नंदी बैलांना क्रमांक दिले व भरघोस असे बक्षिस वितरित करुन दुर्गा माता मंडळ व सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून मागील २५ वर्षांपासून नियमित भरणारा तान्हा पोळा मोठ्या आनंदाने गोविंदाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!