चार वर्षापासून निस्वार्थ सेवा करणारे स्वच्छता मित्रा



मूल प्रतिनिधी 

२०१९ मद्ये सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण धबधबा स्वच्छता अभियानाला सूर्वात करण्यात आली.... २०२३मद्ये निःस्वार्थ विनियोग कार्य स्वच्छ्ता मित्रा करीत आहे. धबधब्याची स्वच्छता करीत असताना खूप अडचणींनी आल्या १२ ही महिने पाण्याचा धबधबा निरंतर वाहत रहावा यासाठी धबधब्याचे उन्हाळ्यातही स्वच्छता निरंतर चालू होती,२०२० पासून पाण्याचा धबधबा निरंतर वाहत आहे, कुठेही खंड पडलेला नाही ,याचा सार्थ अभिमान स्वच्छता मित्रा टीमला आहे , या वर्षात सोमनाथ ला प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहण्यास मिळत आहे भर उन्हाळ्यातही धबधबा वाहत होता. या आधी धबधब्याला मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह पाहण्यात आला नाही असा प्रवाह यावर्षी सोमनाथ धबधब्यावर पाहण्यास मिळत आहे, एकला चलो चा नारा देत गौरव शामकुले व त्याची टीम सातत्याने प्रयत्नशील आहेत.जनतेसमोर स्वच्छतेचे आव्हान करून आपणही या अभियानात स्वामील होण्यासाठी आव्हान करीत होते. मारोडा ग्रामपंचायत, सोमनाथ ट्रस्ट व गावातील एकही पुरुष मंडळी अभियानात सामील झाला नाही. चार वर्ष 
लोटूनही चार-पाच मित्राच्या साह्याने निस्वार्थ आजही सोमनाथ मंदिराची स्वच्छता स्वच्छता मित्र करीत आहे .त्यांची जिद्द, बद्दल घडवण्याचे मनोबल, त्यांच्या अंगी ठुसून भरलेला आहे .जनसामान्या भंगार गोळा करणारे मित्र असे संबोधतात.  चार वर्षात झालेला बदल हा स्वच्छता मित्रा टीमनेच घडवून आणला याचा त्यांना सार्थ अभिमान टीम ला आहे, परिसरात होणारा कचरा यासाठी जनसामान्यांना काही नको म्हणत आम्हाला कचराकुंडी द्या असं बोलत कचराकुंडी मागत असतात, भर पावसाळ्यातही स्वच्छता अभियान प्रामुख्याने सुरू आहे वृक्ष संजीवनी मार्फत मोहाचे ,करंजीचे व विविध प्रकारचे झाड आपल्या परिसरात लावताना दिसत आहेत. मित्रा टीम वाशिंग सेंटर ची माती, जमा झालेल्या बिसलरी बाटल्या जंगलातून जमा केलेले बीज लागवड करून वृक्ष अंकुर तयार करतात व आलेल्या मित्रांना आनंदाचे झाड म्हणून भेट म्हणून देतात ,अशा ध्येयवेड्या निसर्गप्रेमी स्वच्छता मित्राची दखल कुठेतरी व्हावी व निरांतर कार्य घडत राहो. अभियानात प्रतीक मुरकुटे ,बबलू गेडाम , स्वप्निल आकेवार, निलेय गावतुरे ,प्रणय डागमवार, गौरव शामकुले इत्यादी स्वच्छता करीत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!