भवानजीभाई चव्हाण विद्यालयात निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारोह संपन्न
भवानजीभाई चव्हाण विद्यालयात निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारोह संपन्न
भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारोह कार्यक्रम आज दिनांक 1ऑगस्ट 2022 ला घेण्यात आला.. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष एड. वामनराव लोहे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव लक्ष्मणराव धोबे सर, शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. तंन्नीरवार सर, शाळेचे उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे सर, निवृत्त शिक्षकेत्तर कर्मचारी अवधूत कोटेवार बाबू हे उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री तन्नीरवार सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सदर कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व निवृत्त कर्मचारी कोटेवार बाबूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. शाळेतील मुख्य लिपिक श्री अवधूत कोटेवार बाबू हे 31 जुलै 2022 ला आपला सेवाकाळ संपवून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शाळेचे पर्यवेक्षक श्री विधाते सर यांनी आपल्या मनोगतातून कोटेवार बाबू ह्यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा देताना अनेक प्रसंग सांगितले.. श्री कोटेवार बाबू यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. कोटेवार जी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील कडू गोड आठवणींना उजाळा दिला व संस्थेच्या कार्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त केला.. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी संस्थेचे सहसचिव धोबे सर यांनी निवृत्त कर्मचारी कोटेवार जी यांच्या सेवाकाळातील कार्याविषयी माहिती दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... अध्यक्षीय भाषणातून अडव्होकेट लोहे साहेब यांनी निवृत्त कर्मचारी कोटेवार बाबूंना निवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षिका श्रीमती सहारे मॅडम, पर्यवेक्षक श्री विधाते सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उईके सर ह्यांनी तर आभाप्रदर्शन श्री निब्रड सर यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!