सेल्फी विथ तिरंगा स्पर्धा
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
नगर परिषद मुल तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान "तिरंग्यासोबत फोटो - सेल्फी विथ तिरंगा" स्पर्धा राबविण्यात येत आहे तरी राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखून आपल्या घरी तिरंगा फडकवावा. या मोहिमेचे उदिष्टे प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा आहे. तरी स्पर्धकांनी तिरंगा सोबत १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान तिरंगासह फोटो काढून (सेल्फी काढून) पाठवावी.माहिती पाठविण्याकरिता नगर परिषद मार्फत तयार केलेल्या गुगल फॉर्म भरून माहिती पाठवू शकता किवा QR कोड स्कॅन करून माहिती पाठवू शकता. तिरंगा सह सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०२२ ला दुपारी १२ वाजे पर्यंत असून स्पर्धेचा निकाल हा १६ ऑगस्ट ला सायंकाळी ५ वाजता नगर परिषद येथे मुख्याधिकारी मनीषा वजाळे याच्या मार्फत ईश्वरचिट्टीव्दारे निकाल घोषित करणात येईल निकाल हा नगर परिषद मुल च्या फेसबुक पेजवर बघता येईल.विजेत्या स्पर्धकाला १७ ऑगस्टला शहरातील कन्नमवार सभागृह येथे सन्मानचिन्ह व प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल.मुल शहरातील नागरिकांना आवाहन आहे कि सर्वांनी यात सहभागी व्हावे.
गुगल फॉर्म लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScQuKP5zT4TKW8fEoVJV9dvh4UhD-TBP1ZlIWJhynCs5WClsA/viewform?usp=sf_link



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!