तळोधी सोनुली (बूज)रस्त्याची दयनीय अवस्था
तळोधी बा(यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील तळोधी जवळील सोनोली (बुज) या गावाला तळोधी वरून जाणारा रस्ता खूपच दयनीय अवस्थेत असून गावकऱ्यांना गोविंदपुर मार्गाने फिरून जावे लागत आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे मागील काही दिवसापासून तळोधी सोनुली या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमध्ये पाणी असल्याने रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावरून सोनोली ते तळोदी या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचून राहते परिणामी कधीकधी गाडी चालकांना व सायकल स्वारांना याच्या त्रास होतो कधी कधी पडण्याची भीती असते सोनोली (बूज )येथील विद्यार्थी नेहमीच तळोधी (बा.) येथील शाळेत शिक्षणाकरिता जात असतात परंतु रस्ता खराब असल्यामुळे सायकल स्वारांना विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना,आजारी लोकांना तळोधीला येण्याकरिता खूपच त्रास सहन करावा लागतो आहे तरी बांधकाम विभाग यांनी या रस्त्याकडे जातीने लक्ष देऊन खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सोनुलीवासीय जनतेने केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!