टेकाडी येथे तापाची साथ आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

टेकाडी येथे तापाची साथ आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

मूल (प्रतिनिधी) 
मूल  तालुक्यातील टेकाडी गावात मागील तीन-चार दिवसापासून सर्दी खोकला आणि तापाची साथ आली असून, गावातील महिला पुरूष व बालके या साथीमुळे त्रस्त झाले आहेत.
गावात कोणत्याही प्रकारे आरोग्य यंत्रणा गावात आली नाही.  नुकतेच पावसाने थैमान घातले होते, याचा फटका टेकाडी येथील गावकर्‍यांना बसला आहे.
टेकाडी येथील ढिवर मोहल्यांत, जवळपास प्रत्येक घरी रूग्ण तयार झाले असून, उपचाराअभावी सर्व त्रस्त आहे.  गावात आरोग्य प्रशासनाने कॅंम्प लावावा अशी मागणी केली जात आहे.

गावात तापाची साथ नाही
सरपंच उपसरपंच यांचे स्पष्टीकरण
टेकडी येथे तापाची साथ असल्याची बातमी पब्लिक पंचनामा मध्ये प्रकाशित झाली. मात्र गावात अशी कोणतीही तापाची साथ नसून आरोग्य सेवक आकुलवार हे नियमित येत आहेत. काहींना किरकोळ ताप आहे मात्र कोणत्याही प्रकारची साथ नाही, गावात साथ असल्याची विरोधक बुद्धीपुरस्कार माहिती देत आहेत. असे लेखी प्रमाणपत्र टेेेेेकाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!