चिमूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी आणि लोकप्रतिनिधी गाळ झोपेत

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर शहर हे क्रांती भूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे.मोठं - मोठे नेते या क्रांती भूमीतून निवडणुकीला ऊभे राहून मोठे झाले.स्वतःच्या स्वार्थापोटी चिमूर शहर जैसे थेच आहे फक्त राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई मंजूर करण्यात आला.तोही अर्धवट तयार झाला उमरेड ते चिमूर आणि चिमूर ते वरोरा महामार्ग व अजूनही तो तयार झाला नाही वाहतूक खोळंबली चिमूर वरून चंद्रपूर जिल्ह्याला जायचे असेल तर बस करीता २०० रुपये मोजावे लागतात. गरिबांचा वाली कोण असा ? जनतेसमोर तयार झाला आहे.लोकप्रतिनिधी करोडो रुपयांच्या वाहनाने फिरतात त्यांचे वाहन चिखलात फसत सुद्धा नाहीत.असे असतांना मात्र चिमूर शहराचा विकास शून्य असल्यागत आहे.मोठं - मोठ्यांची लेआऊट पडली परंतु ती सर्व नियमबाह्य पद्धतीची लेआऊट तयार केली आहे.त्यामध्ये पक्की रस्ते नाही , नाली नाही, लाईटची सुद्धा व्यवस्था नाही.याबाबत उपविभागीय अधिकारी यांना माहिती असतांना सुध्दा (NA) लेआऊट ची परवानगी तरी कशी काय देण्यात येते असाही ? जनतेला पडला आहे. पावसाळा सुरू असून सतत १५ दिवसाच्या वर झाले पाऊस धो-धो पडत आहे चौफेर पाणीच - पाणी मार्गही बंद पडली आहे. अशातच चिमूर शहरातील केसलापुर , कवडशी ,चावडी , तनिस कॉलनी, खातीकामठा , कोर्ट रोड , माणिक नगर , टिचर कॉलनी , हजारे पेट्रोल पंप , काडकूड नगर ,उप जिल्हा रुग्णालयाच्या मागील भाग येथे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी जमा झाले असून घरांमध्ये सुद्धा पाणीच - पाणी साचले आहे.मंदिरे गाठून घरातील समानाची उचल करणे सुरू आहे.असे असतांना देखील तहसील ची यंत्रणा व नगर परिषद ची यंत्रणा सज्ज नाही वर - वर बघून दवंडी फिरवितात. १ कोटी रुपयांच्या वर वार्षिक कर वसुली चिमूर नगर परिषदेची होत असून विकास अजूनही शून्यच दिसून येते.आता या क्षणी झोपायची वेळ असतांना जनतेला जागे राहून घरातील समानाची उचल करावी लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!