मूल नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम
मूल (मंगला बोरकुटे)
मूल नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली.
प्रतिबंधित असलेली सिंगल युज प्लास्टिक निर्मूलनासाठी आजपासून मूल नगर परिषदेने विशेष मोहीम राबविली आहे.
मूल नगर परिषदेचे प्रशासक महादेव खेडकर यांचे मार्गदर्शनात मुख्याधिकारी मनीषा वजाडे यांचे आदेशाप्रमाणे नगरपरिषदेने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविली आहे. या मोहिमे दरम्यान प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम सांगितल्या जात असून जे दुकानदार सिंगल युज प्लास्टिक वापर करीत आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जात आहे.
आज सकाळी 11 वाजेपासून मूल शहरात ही कारवाई सुरू झाली. या मोहिमेत मूल नगर परिषदेचे अभियंता श्रीकांत समर्थ आरोग्य निरीक्षक अभय चेपूपवार, आलेख बारापत्रे सहभागी झाले होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!