उश्राळ मेंढा येथील नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी मोफत
तळोधी बा (यश कायरकर)
लोकनियुक्त सरपंच मा.हेमराज लांजेवार यांच्या सुंदर संकल्पनेतून नेहमीच उश्राळ मेंढा येथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.त्याच्याच एक भाग म्हणून उश्राळ मेंढा ग्रामपंचायत च्या वतीने पावसाळ्यात लोकांना शुद्ध पाणी देता यावे ज्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या साथीचे आजार व इतर आजार यांच्यापासून दूर राहता यावा यासाठी मा हेमराज लांजेवार यांनी एक गावकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला तो म्हणजे चालू व मागील करवसुली ज्यांनी पुर्णपणे भरलेली आहे अश्या नागरिकांना मोफत आर ओ चे शुद्ध पाणी पिण्याकरिता ४०लिटर मिळणार आहे.
या निर्णयामुळे गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवार यांच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!