विज दर वाढीच्या निषेधार्थ नगर परिषद चौकात आंदोलन आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे
विज दर वाढीच्या निषेधार्थ नगर परिषद चौकात आंदोलन
प्रतिनिधि वसंत मुन
दि. १३ जुलै २०२२ रोजी आम आदमी पार्टी, बल्लारपूर तर्फे शहर संयोजक रविकुमार पुपलवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली, सह-संयोजक अफजल अली जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित सरकारने “विज दर वाढीच्या निषेधार्थ ” बुधवारी, नगर परिषद चौकात आंदोलन करण्यात आले, दिल्लीत “आप”चे सरकार स्थापन झाल्यापासून, दिल्ली राज्यात २००/ युनिट मोफत दिले जात आहेत, पंजाबमध्ये १ जुलैपासून ३००/ युनिट देण्यात आले आहेत, आप सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत नवनिर्वाचित महाराष्ट्र सरकार महागाईने होरपळलेल्या जनतेवर ‘वीज दरात वाढ’ करून अतिरिक्त भार टाकत आहे, सर्वसामान्य जनता हे यापुढे खपवून घेणार नाही, महाराष्ट्र सरकारची मनमानी करू देणार नाही, विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती असूनही जनतेला भरमसाठ वीजबिल भरावे लागत आहे, या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन संपन्न झाल्याबरोबर बल्लारपूर शहर तहसीलदार साहेब यांच्यामार्फत श्री. मुख्यमंत्री साहेब व उर्जा मंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहर सहसंयोजक अफजल अली, सचिव पवन वैरागडे, संघटन मंत्री नीलेश जाधव, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, संघटन मंत्री सरिता गुजर, सचिव ज्योती बाबरे, CYSS सहप्रमुख शिरीन सिद्दीकी, मीडिया सहप्रभारी आशिष फुलझेले, डेपो विभाग प्रमुख कृष्णा मिश्रा, प्रभाग प्रमुख संगीता कालपेल्ली, अवदेश तिवारी, समशेर सिंह चौहान, आशिष गेडाम, रोहित जंगमवार, सौरभ चौहान, प्रशांत गड्डाला, बेबीताई बुरडकर, प्रीती जगताप यांच्यासह अनेक क्रांतिकारी सहकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!