हुमन नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी संकटात दोन गावांचा तुटला संपर्क

हुमन नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी संकटात दोन गावांचा तुटला संपर्क     
   
    

  सिंदेवाही (वार्ताहर)
नवरगाव वरून १०कि.मी.अंतरावर असलेल्या सरांडी, खांडला येथे दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हुमन नदीला महापुर आलेला असून दोन गावांचा संपर्क तुटला आहे,चार वर्षानंतर हा महापुर आल्याने दोन्ही गावातील ९०%परिसर पाण्याने व्यापला असून लाखोंची नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे,दोन्ही गावे ही वेल वर्गीय फळ भाज्या लागवड करणारे गावे असून कारला, शेंगा या दोन्ही पिकाची नुकसान झालेली आहेच,परंतु भात उत्पादन हे रोवणी केलेले आणि भात रोपे यांची अतिशय नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे,पाण्याचा प्रेशर वाढत असून त्यामधे मोटार पंप, नांगरणीचे साहित्य पुरामधे सापडल्याने शेतकरी चिंतेत पडलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!