नेरी- गोविंदपूर - तळोधी मार्गाचे काम कासवगतीने व नित्कृष्ट, या रस्त्यात गाड्या फसून, घसरून पडल्यामुळे रोजच अपघात.

नेरी- गोविंदपूर - तळोधी मार्गाचे काम कासवगतीने व नित्कृष्ट, या रस्त्यात गाड्या फसून, घसरून पडल्यामुळे रोजच अपघात.
 तळोधी बा (यश कायरकर.) ;
          येत्या दोन-तीन वर्षापासून सुरू असलेल्या नेरी  - गोविंदपुर -  तळोधी या मार्गाचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्यामुळे.  व पावसाळा पूर्व कुठलेही नियोजन न करता काम तसेच सोडून दिल्यामुळे.  या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.  भारी वाहन ट्रक , बस हे तर या रस्त्यावर सतत फसत असल्याने रोजच वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. तर  दुचाकी स्वारांच्या दुचाकी घसरून पडल्यामुळे रोजच कित्येक अपघात या अर्धवट रस्त्यावर होत आहेत.  काही अंतरापर्यंत गाडी ढकलत न्यावे लागते. तर महिलांना घेऊन प्रवास करताना सुद्धा मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे . 
तसेच शासकीय परवानगी,व बांधकाम विभागाची रस्ते बांधकाम करताना लोकल पांढरी गिट्टी वापरन्यास बंदी घालण्यात आली असून सुद्धा गोविंदपूर जवळपास या नित्कृष्ट दर्जाच्या गिट्टीचा वापर करन्या करिता रस्त्यावर या पांढर्या गिट्टिचे मोठ - मोठाले ढग टाकलेले निदर्शनास येत आहेत.
याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक केली असून ठेकेदाराने सुद्धा असे निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केलेल्या कामामुळे परिसरातील लोकांमध्ये जनाक्रोश वाढत असून आता रस्त्यावरच धरणे देण्याचे परिसरातील या रस्त्यावर सतत ये-जा करणार्या लोकांनी आत्ता ठामपणे ठरविलेले आहे.
           "अशा पद्धतीची पांढरी गिट्टी रस्ते बांधकाम करताना वापरण्याची कुठलीही  परवानगी ठेकेदाराला नाही.  व त्यांनी याबाबत आम्हाला माहिती पुरवली नाही तर अशी नित्कृष्ट पांढरी गिट्टी रस्त्यावर टाकली आढळल्यास आम्ही ती तात्काळ उचलायला लावू" -  शिवलकर  जु. अभियंता, बांधकाम विभाग नागभीड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!