अज्ञात वाहनाच्या धडकते दुचाकी स्वाराचा मृत्यू राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघाताचे हॉट स्पॉट

अज्ञात वाहनाच्या धडकते दुचाकी स्वाराचा  मृत्यू
राष्ट्रीय महामार्ग ठरतोय अपघाताचे हॉट स्पॉट


सिंदेवाही: (प्रतिनिधी) 
सिन्देवाही शहरापासून ४कि.मि अंतरावर असलेल्या 
 मेंढा माल,खातगाव भेंडाळा  फाट्या जवळ गुरुवार दिनांक २३ जून ला सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकते दुचाकी स्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू.

सविस्तर वृत्त असे की गुरुवार दिनांक २३ जून २०२२ ला सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान तळोधी गावावरून कार्यक्रमा वरुन सिंदेवाहीकडे दुचाकीने येत असतांना सिंदेवाही तालुक्यातील वासेरा निवासी प्रकाश चिंतामन आनंदे वय अंदाजे 22 वर्ष यांचा सिन्देवाही शहरापासून ४ कि.मि अंतरावर  मेंढा माल,खातगाव,भेडांळा फाट्याजवळ  अपघात झाला. अपघात झाल्याची माहीती मिळताच नागरींकानी अपघात स्थडी गर्दी केली,अपघाताची माहिती नागरिकांनी सिंदेवाही पोलीसांना दिली.माहीती मिळताच सिन्देवाही पोलीस स्टेशनचे ठानेदार  योगेश घारे पोलीस आपल्या चमु सह घटनास्थळ गाठुन अपघातात जखमि झालेल्या प्रकाश चिंतामन आनंदे यास तात्काळ ग्रामिन रूग्नालय सिन्देवाही येथे भरति करण्यात आले व घटनेचा पंचनामा केला.
 सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करुन आनंदे यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रूग्णालय चंद्रपुर येथे पाठविण्यात आले मात्र आनंदे यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृतु झाला.
सिंदेवाही पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार प्रकाश चिंतामन आनंदे ह्यांची दूचाकी वरून नियत्रण सुटल्यामुळे  त्यांचा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताच्या वेळेस परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे दुचाकी अनियत्रीत होउन अपघात झाला असल्याचे अंदाज सिन्देवाही पोलीसांनी काढला.मात्र, नागरिकांत अशी चर्चा आहे की अज्ञात वाहनाच्या धडकते हा अपघात घडला.पूढील तपास सिन्देवाही पोलीसठान्याचे पोलीस निरिक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाथ पि.एस.आय.ठाकरे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!