तळोधी येथे 'स्वाब' संस्थेने दिले आज परिसरातील सहा वेगवेगळ्या विषारी सापांना जीवदानं

तळोधी येथे 'स्वाब' संस्थेने दिले आज परिसरातील सहा वेगवेगळ्या विषारी सापांना जीवदान
तळोधी बा.;
  तळोधी वन परिक्षेत्रातील कार्यरत पर्यावरण प्रेमीे संस्था 'स्वाब' च्या अध्यक्षांनी दिले सहा वेगवेगळ्या विषारी सापांना आज जंगलात सोडून जीवदान दिले.
    पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण परिसरामध्ये सापांचे दिसण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे घरात व घर परिसरात दिसणाऱ्या सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम हे सर्पमित्र नेहमीच करत असतात.
        प्रमुख्याने पावसाळ्या मध्ये पावसाचे पाणी  बिळात गेल्याने व  सुकलेली जागेच्या शोधात साप मोठ्या प्रमाणात घरात घुसतात.  त्यामुळे जिवाच्या आकांताने परिसरातील सर्पमित्रांना लोक पाचारण करतात. व नंतर सर्पमित्र जीवाची परवा न करता व शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसताना सुद्धा वेळेवर जाऊन या सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांचे जीव वाचवण्याचे कार्य करत असतात.     
                   तळोधी बा. परिसरात स्वाब संस्थेचे अध्यक्ष, सर्पमित्र  कायरकर यांनी आज अशाच प्रकारे आलेल्या फोन काल वर  आपले कर्तव्य समजून परिसरातील वाढोणा, वलनी, कन्हाळगाव, सावरगाव अशा वेगवेगळ्या गावांमधील  सापांना पकडून त्यांची तळोधी वनविभागात नोंद करून परिसरातील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. 
  नाग, घोणस, मण्यार, धामन, या  सापांना आज पर्यावरण मुक्त करन्यात आले.  या वेळी, तळोधी चे वनरक्षक एस. बी. पेंदाम, श्रेयश कायरकर, दिपक बारसागडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!