चिखली येथील विरूजी कळस्कर यांचे गोठ्याला आगलाखोचे नुकसान
मुल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यातील चिखली येथील विरूजी कळस्कर यांचे गोट्याला आज सकाळी आग लागल्याने खळबळ माजली.
गावकऱ्यांनी प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. आगीने रौद्ररूप धारण केल्याने, मुल येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि आग आटोक्यात आली. आग बघणार्यांची गर्दी मोठी झाल्याने,
यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आगीमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाल्याने विरूजी कळस्कर यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!