राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
उमरी पोतदार(प्रतिनिधी)
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जि- नागपूर अंतर्गत छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा ता.जि- चंद्रपूर च्या वतीने उमरी पोतदार येथे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 30 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये शाश्वत विकासासाठी ग्राम जागर या संकल्पनेवर आधारित वेगवेगळ्या विषयावर जनजागृती करण्यात आली.
30 मार्च रोजी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे आगमन झाले व सायंकाळी माजी सभापती अल्काताई आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गावाच्या शाश्वत विकासासाठी रा. से. यो. च्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरण, महिला सक्षमीकरण, प्रदूषण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या विषयांवर पथनाट्य,प्रबोधनात्मक नाटके, नृत्ये , समूह गीते यांच्या माध्यमातून गावकाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.त्याचबरोबर स्वयंमसेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून गावाची स्वछता, कचरा कुंड्यांची स्वछता , जि. परिषद शाळेची स्वछता तसेच ग्रामपंचायत मध्ये बगीच्याची निर्मिती इत्यादी कामे करण्यात आली.
दि. 4 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजी ढूमणे व इतर प्रमुख पाहुणे आणि सरपंच- सौ.ठामेश्वरी लेनगुरे व उपसरपंच- मंगेशजी उपरे व इतर प्रतिष्ठित गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीने समारोपीय कार्यक्रम पार पाडण्यात आला.
संपूर्ण शिबिर प्रभावीपणे संपन्न करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. बोंडे सर, रा. से. यो. प्रतिनिधी पवन मेंढे व वैष्णवी पासपुते आणि उपप्रतिनिधी अवंती टोंगे , संकेत घाटे यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. या शिबिराला पार पाडण्यासाठी गावातील *पाहणारे डोळे"आणि मदतीचे हात* बहुउद्देशीय सामाजिक ही संस्था निस्वार्थ भावनेने मदत केली. त्याच प्रमाणे गावातील बचत गट, ग्रामपंचायत उमरी पोतदार, उप-पोलीस ठाणे उमरी पोतदार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी पोतदार यांचा मोठा सहकार्य लाभला.
त्यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अंकुश उराडे, संदीप येम्पलवार,निखिल झबाडे,निखिल झुरमुरे,भिमराव मेश्राम,अमित कुमरे,विक्रम लेनगुरे ,अविनाश लेनगुरे, चेतन कावळे,चंद्रकांत सिडाम,नदीम कुमरे,महेश कुळमेथे,तेजराज सिडाम,मनीष ठाकरे ,अंकुश लेनगुरे यांनी सहकार्य केले.
या सर्वच सहकाऱ्यांच्या सहकार्यतून उमरी पोतदार येथे हा सात दिवशीय शिबीर मोठ्या उत्साहात प्रभावीपने पार पडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!