अवकाशातील ते अवशेष सिंदेवाही तालुक्यात पडले
सिंदेवाही (शशिकांत बतकमवार)
अवकाशातील ते अवशेष सिंदेवाही तालुक्यात पडलेविदर्भासह राज्यात सायंकाळी ७.३० वाजताचे दरम्यान आकाशात उल्का सदृश्य वस्तू दिसल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती. या दरम्यान आकाशातून आठ ते दहा डायमीटर असलेली रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे पडली. यामुळे परिसरात खळबळ माजली. घटनेच्या ठिकाणी गर्दी जमा होऊ लागल्याने ही रिंग पोलीस स्टेशनला आणून जमा केल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.
असे अवशेष आरमोरी भागातही पडले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!