मॅजिक बस फाउंडेशन ने केली मतदान जनजागृती, शालेय बालपंचायत स्थापन करून विध्यार्थ्यांना दिली माहिती

मॅजिक बस फाउंडेशन ने केली मतदान जनजागृती, शालेय बालपंचायत स्थापन करून विध्यार्थ्यांना दिली माहिती

मूल (अमित राऊत) 

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर तसेच तालुक्याचे क्लस्टर मॅनेजर हिराचंद रोहनकर सर  यांचे  मार्गदर्शनाखाली  दिनांक 23 मार्च २०२२ रोजी जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथे निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली.या  निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार करणे,प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.

शालेय बालपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक श्री मनोज अहिरकर सर, संजय अहिरकर सर , खडसंग मॅडम,  तसेच शाळेतील शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित राहुन हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.

यावेळी, शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे ,प्राची वेल्हेकर व  समुदाय समन्वयक राकेश भोपये , कार्तिक लोणारे , अश्विनी ढवस , काजल कष्टी ,  यांच्या  सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.

निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी, अतिशय शांतता ठेऊन तसेच कोरोना नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!