माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटने च्या भंडारा जिल्हाध्यक्ष पदी शेखर जिभकाटे यांची नियुक्ती

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटना चे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल अहमदनगर येथे प्रदेश कार्यकारिणी ची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक उमेश काशीकर यांच्या शिफारशीनुसार शेखर जीभकाटे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रदेश सचिव सौ श्वेता व्हनमाने, संपर्कप्रमुख भरतजी नजन, धनश्री उत्पात, प्रदेश उपाध्यक्ष निजाम पटेल, वजीर शेख, समन्वयक रमेश जोशी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन दिघे गुरु यांची उपस्थिती होती.शेखर जिभकाटे यांनी निवड झाल्यानंतर सांगितले की आपण लवकरच भंडारा जिल्ह्याचा दौरा करणार असून आपली माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण संघटना प्रत्येक तालुक्यात व गावात स्थापन करुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु. आणि प्रत्येक तालुक्यात मजबूत संघटन करु व लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर करुन समाजाची सेवा करुन समाजाला सहकार्य करु. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नुतन जिल्हाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. तसेच भंडारा जिल्ह्य़ातुन सर्वच स्तरांवरून त्यांच्या निवडीचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!