मौजा हळदी येथे जागतिक महिला दिन संपन्न
*मौजा हळदी येथे जागतिक महिला दिन संपन्न*
मूल - मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, उमेद महिला ग्रामसंग व ग्रामपंचायत हळदी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा हळदी गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माहीलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्या मध्ये प्रामुख्याने कब्बडी , रिलेरेस व रिंगरोल नावाचा नाविन्यपूर्ण खेळ घेण्यात आला. या मागील मुख्य हेतू असा की विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच "चूल आणि मूल" या संकुचित रेषेला ओलांडून एक पाऊल समोर येतील व आपल्यातील कला कौशल्य सादर करतील. कार्यक्रमाच्या उद्देशा प्रमाणे गावातील बहुतांश महिलांनी कार्यक्रमात व स्पर्धेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. मेघाताई मडावी सरपंच ग्रामपंचायत हळदी यांची उपस्थिती होती, तर उद्घाटक म्हणून मा. महेश चीचघरे उपसरपंच ग्रामपंचायत हळदी व मा. निकिता ठेंगणे तालुका निरीक्षक मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. रंगारी साहेब प्रभाव समन्वयक, मा. स्नेहल मडावी साहेब तालुका समन्वयक उमेद अभियान, मा. वर्षा शरद भुरसे अध्यक्षा उमेद ग्रामसंघ,
मा. निशा विनोद कोठारे ICRP,
मा. दुर्गा संतोष गेडाम ICRP,
मा. मयूर गडमवार सर कृषि व्यवस्थापक, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य व समस्त हळदी ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. सर्व स्पर्धांच्या शेवटी विजेत्या महिला खेडाळूना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कु. भाविक कारडे ग्रामरोजगार सेवक ग्राम पंचायत हळदी व कु. योगेश्वर लेनगुरे समुदाय समन्वयक मॅजिक बस इंडीया फाउंडेशन हळदी यांनी अथक परिश्रम घेतले...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!