चिमूर शहरात पट्टेदार वाघाचे व बिबट्याचे वास्तव्य दैनंदीन शेतकऱ्यांना घडतात दर्शन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हा हा व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे.देश - विदेशातील पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत असतात.परंतु वनविभागाचे जंगलातील प्राण्यांकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. चंद्रपूरातील विज निर्मिती केंद्रातील कामगारास पट्टेदार वाघाने उचलून नेऊन ठार केले. त्याचबरोबर काही गावकरी यांनाही ठार केल्याची घटना हि चर्चित असतांना आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये सुद्धा सोनेगाव बेगडे येथील शेतकऱ्यास पट्टेदार वाघाने तुकडे - तुकडे करून ठार केल्याची घटना घडली तसेच कोलारा येथेही महिला वनरक्षक यांना सुद्धा ट्रांझेक्ट लाईन चे काम करीत असतांना पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना घडली असूनही प्रादेशिक वनविभाग ,बफर , आणि कोअर व एस.टी.पि.एफ.चे अधिकारी सुस्त बसून असल्यागत वागत आहे.दैनंदिन दर्शन घडणाऱ्या वाघामुळे शेतकऱ्यांना धोका आहे.याबाबत च्या अनेक लेखी तक्रारी सुद्धा असतांना वारंवार दुर्लक्ष का ? केवळ व्याघ्र प्रकल्प हा पैसा कमविणे हेतू न ठेवता जनतेचे रक्षण करणे सुद्धा आवश्यक आहे. वनविभागामार्फत लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये दैनंदिन पट्टेदार वाघ व बिबट्याचे चित्रीकरण आढळून येतात.केवळ अधिकाऱ्यांनी सुस्त बसून राहू नये अन्यथा पुन्हा वाघाने ठार केल्याच्या घटना घडतील असा अंदाज नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!