प्रवासी निवार्यांचे बांधकाम अर्धवट सोडल्याने प्रवाशांचे हाल बांधकाम विभागाचे ठेकेदाराकडे दुर्लक्ष, कासवगतीने व नित्कृष्ट दर्जाचे.

प्रवासी निवार्यांचे बांधकाम अर्धवट सोडल्याने प्रवाशांचे हाल
 बांधकाम विभागाचे ठेकेदाराकडे दुर्लक्ष, कासवगतीने व नित्कृष्ट दर्जाचे.



तळोधी बा.: (यश कायरकर)

          गेल्या चार पाच वर्षापासून नागभीड - मुल रोडचे रुंदीकरणाचे काम सुरू असून. त्याकरिता हजारो रस्त्या लगत असलेले मोठमोठाले हजारो झाडे तोडण्यात आली. मात्र नवीन झाडे लावली गेली ती पन अर्धवट मेलेली. सोबतच प्रत्येक गावच्या जुन्या असलेल्या बस स्थानकांना सुद्धा तोडण्यात आले. त्यानंतर रोड रुंदीकरणाचे काम सुरू झाले. आणि नागभीड पासून पळसगाव(जाट) पर्यंत येत्या चार-पाच वर्षात फक्त पंचवीस - तीस किलोमीटर पर्यंत कासव गतीने हे काम रेंगाळत आले. आणि समोर एक किलोमीटर पर्यंतचे काम सुरू असतानाच  मागे एक महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर लगेच खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे‌. यामुळे डांबरीकरणाचे काम योग्य तेवढा डांबराचा मिश्रण न वापरतात निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे.
          सोबतच गावात गावातून रोडच्या दोन्ही बाजूंना नाल्याही बनवीण्यात आल्या. नवीन उंच नाल्या बनवताना त्या वरून जुन्या रहदारीचे रस्ते व नाल्याच्या बाजूंना असलेल्या घरांसाठी ठेकेदारामार्फत रस्ते सोडल्या जाऊन, नाल्यांवरून  चढ-उतार करण्याकरता रस्ते करून देणे गरजेचे होते. मात्र ठेकेदारांनी जिथे नकोत तिथे रस्ते सोडले.  तर ज्यांना आवश्यकता आहे, त्यांना नाल्याच्या वरून घरी जाण्याकरता अडचण होते मात्र ते गरीब परिवार असेल तर त्यांच्याकडे डोळेझाक करत त्यांना रस्ते बनवून दिले नाही.




        सोबतच गावा - गावामधले (बस स्टॉप) प्रवासी निवारे सुद्धा दोन - तीन वर्षांपूर्वी तोडण्यात आले. मात्र  या गावातून रोड पूर्ण होऊन सुद्धा ते प्रवासी निवारे आजपर्यंत उभे करण्यात आले नव्हते. आणि आता एक महिन्यापूर्वी ते प्रवासी निवारे चे लोखंडी शेड उभे तर करण्यात आले. मात्र त्यांचा काँक्रीट बांधकाम व प्रवाशांना बसण्याकरता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळभर पावसाळ्यात भिजत, तर आता उन्हाळा तापणाऱ्या उन्हात या निवार्‍या बाहेर शालेय विद्यार्थी, म्हातारे लोक, अशा प्रत्येक प्रवाशांना तापणाऱ्या उन्हामध्ये उभा रहावे लागत आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग, शासकीय अधिकारी यांनी त्यासंबंधी ठेकेदाराला सुचनाही दिलेल्या नाहीत? त्यामुळे बांधकाम करणारे रस्ते ठेकेदार यांनी सुद्धा निष्काळजीपणा करत फक्त टिनाचे शेड उभे करून प्रवासी निवारे तसेच अर्धवट ठेवून दिलेले आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
         तरी जनप्रतिनिधी (पी.डब्ल्यू.डी.) रस्ते बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी लवकरात लवकर हे प्रवासी निवारे पुर्ण करावे. व त्यांचा व्यवस्थित बांधकाम करावा जेणेकरून प्रवाशांना उन्हाळ्यात तप्त उन्हात भाजावे लागणार नाही .अशी लोकांनी मागणी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!