जिल्हा बँकेच्या वतीने कॅन्सर ग्रस्त व्यक्तीला उपचाराकरिता आर्थिक मदत
रवींद्र शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश वितरित
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हयातील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फ़े शेतकरी, शेतमजूर, तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यातून नागरिकांचा स्तर उंचावण्याचे काम जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या वतीने आरोग्यासाठी सुद्धा विविध योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकरी कल्याण निधी योजना होय. या माध्यमातुन आजपर्यंत अनेक कॅन्सर ग्रस्त, हृदय रोगावर उपचार सुरू असलेल्या नागरिकांना याचा लाभ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नाने देण्यात आलेला आहे. त्यांनी स्वतः लक्ष देऊन वरोरा भद्रावती तालुक्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
भद्रावती तालुक्यातील माजरी येथील महिला छाया बंडू झाडे यांचे पती कॅन्सर ने ग्रस्त असून त्यांची परिस्तिथी हलाखीची असल्याने त्यांनी रवींद्र शिंदे यांच्याकडे मदत मिळण्यासाठी विनंती केली. रवींद्र शिंदे यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून त्यांचे कागदपत्र मागवून त्यांना उपचाराकरिता निधी मंजूर केला व आज दि.(६) ला त्यांचे निवासस्थानी छाया बंडू झाडे यांना रवींद्र शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला.
याप्रसंगी रमेश मेश्राम, गायत्री यमलावर, राजू पिंपळापुरे आदी उपस्थित होते. यावेळी पुढेही काही मदत लागल्यास तेही करण्याचे आश्वासन रवींद्र शिंदे यांनी दिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!